मुक्तछंद रचना

शिवस्तुती
जप नित्य करावा शिवशंभोचा,
तप करिता प्रसन्न होई,
असे विश्वास सदा मनी,
ह्रदयी भाव भोळा राही,
देव असे भावाला भुकेला,
ठेव आपुली असे नामस्मरणात,
बारा ज्योतिर्लिंग मंत्रशक्ती,
सारा जन्म मिळे भक्ता मुक्ती,
असे दर्शन पहिले सोमनाथाचे ,
वसे गुजरात- गीर नगरी,
मल्लिकार्जुन श्रीशैले ,
उज्जैनी महाकालेश्वर ,
देई दर्शन ओंकारेश्वर मध्यप्रदेशी,
येई वैजनाथ देव महाराष्ट्र राज्ये,
भीमाशंकर स्थान महाराष्ट्र स्थित,
रामेश्वर स्थान तामिळनाडू दिसे,
द्वारकेत देवस्थान नागनाथाचे ,
वाराणशीत विश्वेश्वराचे ,
नाशिक महाराष्ट्रात त्र्यंबकेश्वर ,
उत्तराखंडात केदारनाथ ,
महाराष्ट्रात वेरुळस्थानी,
घृष्णेश्वर मंदिर पुजनिय,
अशी मुख्य बारास्थाने,
परमेश्वर शिवशंकराची,
भक्तीभावे येती भक्तगण,
नमस्कार भावे करिता,
भोळा शंकर प्रसन्न होई,
दर्शन घेता मन शांत होई,
ओम नमः शिवाय ,
मंत्र नित्य जपता ,
आयुष्याचे सार्थक होई……
धन्यवाद! सौ. दीपाली प्र कांदळगांवकर

Quality
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.

Support
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.
About Hestia
Need more details? Please check our full documentation for detailed information on how to use Hestia.
