सण असे मोठा, वर्षात दसरा,
आनंदे साजरा, होत असे।।१।।
गोडधोड खाऊ, पंचपक्वान्नाचे,
मिळे खावयाला, घरोघरी ।।२।।
शुभदिन असे, सोनेनाणे घ्यावे,
देवाला पुजावे, भक्तीभावे।।३।।
सकलजणांनी, बाणावे सद्गुण,
अंगीचे दुर्गुण, त्यागुनीया।।४।।
राग लोभ नको, प्रेम मनी यावे,
आनंदे रहावे, सदाकाळ।।५।।